पोस्ट्स

इमेज
  रहस्यमय खिडकी गावापासून तीन किलोमीटर दूर, काळ्या पाषाणात बांधलेला सरनाईकांचा साडेतीनशे वर्षे जुना वाडा उभा होता. कौलारू छप्पर, आभाळाला भिडणाऱ्या भिंती आणि चारही बाजूंनी दाट जंगल. वाड्याभोवतीची दलदल पंचक्रोशीत कुप्रसिद्ध होती. गावकरी म्हणत, “त्या दलदलीत गेलेला माणूस परत येत नाही.” सरनाईक कुटुंब मात्र या गोष्टी हसून उडवून लावत असे. कर्नल साहेबराव सरनाईक सैन्यातून निवृत्त झालेले. पत्नी सीमाताई, मुलगी रिटा, मुलगा राहुल. बाप-लेकाला जंगलभ्रमंतीचे वेड, आणि त्यांचा टॉमी कुत्रा सावलीसारखा त्यांच्या मागे. त्यांचे जिवलग स्नेही आशाताई आणि अशोकराव सरंजामे. आशाताई मुख्याध्यापिका, तर अशोकराव निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर. दरवर्षी कोजागिरीला दोन्ही कुटुंबे वाड्यात जमत. शेकोटी, आटवलेले दूध आणि जागरण. यंदा आशाताईंची मुलगी रीमा दोन दिवस आधीच वाड्यावर आली होती. मानसशास्त्राची अभ्यासक. माणसे काय बोलतात यापेक्षा ती कशी वागतात, यावर तिची नजर असे. आणि म्हणूनच तिला सोपान बुवा मुळीच आवडत नसत. गावोगावी कीर्तन-प्रवचन करणारे बुवा आशाताईंकडे कायमचे पाहुणे. व्यासपीठावर ते पहाटे उठण्याचे, साधेपणाचे, त्यागाचे गोडवे ...
इमेज
रामभाऊ रामभाऊ आज खूप आनंदात होते. कॅनडाला असलेल्या मुलीकडे आणि जावयाकडे चार महिने, तर अमेरिकेतील मुलाकडे आणि सुनेकडे चार महिने राहून ते तब्बल आठ महिन्यांनी भारतात परतले होते. दोन दिवसांत घरातील पसारा आवरला. परदेशातून आणलेल्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी झाल्या. आणि आज आठ महिन्यांनी पहिल्यांदा ते पेन्शन काढण्यासाठी बँकेत गेले. पासबुक घेतले. विथड्रॉल स्लिप भरली. आणि कॅशियरच्या खिडकीसमोर जाऊन उभे राहिले. कॅशियरने एकदा रामभाऊंकडे पाहिले, एकदा संगणकाच्या स्क्रीनकडे पाहिले आणि पुन्हा रामभाऊंकडे पाहिले. रामभाऊंना वाटले, काय झालं? एवढं काय पाहतोय? कॅशियर म्हणाला, “रामभाऊ, तुम्ही मॅनेजर साहेबांना भेटून या.” “का बरं?” “तुमचे पैसे निघू शकत नाहीत.” “का?” “ते साहेब सांगतील.” रामभाऊ मॅनेजरच्या केबिनमध्ये गेले. मॅनेजरने संगणकावर काहीतरी तपासले आणि म्हणाले, “रामभाऊ, तुमच्या खात्याला चार महिन्यांपूर्वी ‘मृत’ असा स्टेटस लागला आहे.” “काय?” रामभाऊंच्या चेहऱ्यावरचे हास्य क्षणात गायब झाले. “पण मी तर तुमच्यासमोर जिवंत उभा आहे!” मॅनेजर म्हणाले, “हो, ते मला दिसतंय.” “मग माझं अकाउंट मृत ...
इमेज
  छोट्याशा चाळीत त्यांनी आपला संसार थाटला होता. ते दोघे आणि त्यांची दोन चिमुरडी मुले—चिंगी आणि पिंट्या. दोन वेळच्या जेवणासाठी दिवसभर संघर्ष करणारे ते कुटुंब. शिक्षण फारसे झालेले नव्हते. त्यामुळे मिळेल ते काम करायचे आणि त्यातून संसाराचा गाडा पुढे ढकलायचा, एवढेच त्यांचे आयुष्य. गणपती जवळ आला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी रस्त्याच्या कडेला एक कोपरा पकडला आणि गणपतीच्या सजावटीचे साहित्य विक्रीसाठी मांडले. छोटे लाकडी पाट, विविध रंगांचे कापड, प्लास्टिकच्या फुलांच्या माळा, पाण्यावर तरंगणारे दिवे आणि मागे लावण्यासाठी रंगीबेरंगी छापील पडदे... सकाळी सात वाजता सुरू होणारा त्यांचा व्यवसाय रात्री अकरा वाजेपर्यंत चालायचा. दिवसभर नवरा-बायको दोघेही रस्त्याच्या कडेला बसून ग्राहकांची वाट पाहायचे. पण त्याच वेळी त्यांच्या छोट्याशा घरात दोन चिमुरड्यांची वेगळीच धावपळ सुरू होती. “ताई...” “काय रे पिंट्या?” “आपण कधीच गणपती बसवत नाही ना?” चिंगी काही क्षण शांत राहिली. “अरे, आई-बाबांना वेळ नसतो ना... आणि आपल्याकडे गणपती आणायला पैसेही नसतात.” पिंट्या थोडा विचार करून म्हणाला, “ताई, आपण गणपतीसाठी पैसे जमवले...
इमेज
  ज्याच्या श्रमावर घराची चूल पेटते, त्याच्या श्रमांची जाणीव ठेवणे म्हणजेच आजचा दिवस. श्रावण संपत आलेला असतो. शेतात हिरवळ डोलत असते, मातीचा सुगंध दरवळत असतो आणि गावाकडे तयारी सुरू होते ती बैलपोळ्याची. वर्षभर उन्हात-पावसात शेतकऱ्याबरोबर राबणाऱ्या बैलांना त्या दिवशी कामातून विश्रांती मिळते. त्यांना स्वच्छ अंघोळ घातली जाते, शिंगांना रंग दिला जातो, अंगावर झूल चढवली जाते, गळ्यात घुंगरमाळा बांधली जाते आणि औक्षण करून गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. पोळा म्हणजे केवळ बैल सजवण्याचा दिवस नाही; तो कष्टाची जाणीव ठेवण्याची आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची एक सुंदर परंपरा आहे. बैल आणि शेतकरी — सहजीवनाचं नातं पूर्वीची शेती बैलांशिवाय कल्पनाच करता येत नव्हती. नांगरणी, पेरणी, मळणीपासून शेतमालाच्या वाहतुकीपर्यंत अनेक कामांमध्ये बैल हा शेतकऱ्याचा अविभाज्य साथीदार होता. हे नातं केवळ मालक आणि जनावराचं नव्हतं. शेतकऱ्याला आपल्या बैलाचा स्वभाव माहीत असे; त्याची ताकद, त्याचा थकवा आणि त्याची गरजही तो ओळखत असे. शेतात राबणारा हा जीव घरातील सदस्यासारखाच जपला जायचा. म्हणूनच वर्षातील एक दिवस त्याच्या श्रमांचा सन्मान कर...
इमेज
  फुंकर बालपण म्हणजे निरागसतेचं एक सुंदर विश्व... आणि त्या विश्वात प्रत्येकाच्या वाट्याला येणारा एक हळवा क्षण असतोच. खेळता खेळता दाराच्या फटीत बोट सापडतं, धावता धावता गुडघा खरचटतो, अनवधानाने एखादा दगड पायाला रुततो... आणि क्षणार्धात वेदनेची कळ काळजाचा ठाव घेते. डोळ्यांच्या कडा ओलावतात, ओठ थरथरतात. आसपास कुणी नसेल, तर इवलंसं मन स्वतःच स्वतःला सावरतं. दुखरं बोट अलगद हातात घेतं, वाहणारे अश्रू पुसतं आणि नकळत ओठ त्याजवळ नेतं... “फु... फु... फु...” ती छोटीशी फुंकर म्हणजे कोवळ्या वयात स्वतःचं दुःख स्वतः पेलण्याची पहिली शिकवण असते. पण दुःख मोठं झालं आणि आपली हाक कुणाच्या कानावर गेली, की आई, आजी किंवा काकू धावत येते. आई तो इवलासा हात आपल्या ओंजळीत घेते. जखम पाहते आणि अलगद म्हणते— “काही नाही रे... आता बरं वाटेल.” आणि जखमेवर उमटते... मायेची तीच जादुई फुंकर. कधी पदराचा मऊ बोळा जखमेवर टेकवला जातो, कधी डोक्यावरून हात फिरतो. ना औषध, ना मलम... तरी वेदना कमी झाल्यासारखी वाटते. जखम तिथेच असते; पण तिचं दुःख वाटून घेणारं कुणीतरी जवळ आलेलं असतं. खरं तर ती फुंकर जखमेवर नसतेच... ती मनावर असते. त्या फुंकरि...
इमेज
  विनोदी कथा आजोबांचा 'महत्त्वाकांक्षी' फोटो खरं तर सगळं कुटुंब आजी-आजोबांना जपत होतं. त्यांच्या वयाचा, त्यांच्या सुखाचा सगळेच विचार करत होते. पण एक गोष्ट मात्र आजोबांना अजिबात मान्य नव्हती—आपलं वय झालंय! मुलगा-सून कामावर गेले की घरातील आजी, नातवंडं, कामवाली सगुणा आणि तिचा नवरा रघु... या सगळ्यांवर आजोबांची हुकूमत सुरू व्हायची. नुकतेच आजी-आजोबा काश्मीरला फिरून आले होते. तिथे काश्मिरी पोशाखात काढलेला दोघांचा एक सुंदर फोटो आजोबांच्या मनात भरला होता. तो फोटो दिवाणखान्याच्या भिंतीवर अगदी उठून दिसेल अशा ठिकाणी लावायचा, असा आजोबांचा निर्धार झाला. आजही मुलगा-सून कामावर गेले होते. आणि आजोबांनी अचानक घोषणा केली— "आज हा फोटो भिंतीवर लावायचाच!" रघु लगेच म्हणाला, "दादा, तुम्ही राहू द्या. मी लावतो." आजोबांनी त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. "तुम्ही लोक काळजी करू नका! हे काम मी करतो!" आणि बस्स... एका साध्या फोटोला भिंतीवर टांगण्याचं काम होतं; पण आजोबांनी त्याचं रूपांतर जणू घरगुती महाभारतातच करून टाकलं! आजोबांनी संपूर्ण घराला कामाला लावलं. एका नातवाला खिळे आणायला पाठव...