व्यक्ती चित्र रंग्या... चौधरी सरांचा वर्ग सुरू होता... वर्गात नेहमीची शांतता होती. चौधरी सर शिकवत होते आणि आम्ही सगळे आपापल्या वहीत काहीतरी लिहिण्याचा आव आणत होतो. पण आमच्या वर्गात एक असा विद्यार्थी होता, ज्याच्यासाठी शाळा म्हणजे केवळ शिकण्याची जागा नव्हती; शाळा म्हणजे त्याच्यासाठी जगण्याचा अनुभव होता. तो म्हणजे—रंग्या! रंग्या म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व! शाळेवर त्याचे इतके प्रेम होते की, प्रत्येक वर्गात दोन-तीन वर्षे मुक्काम करूनच तो पुढील वर्गात जायचा. आम्ही वर्ग बदलायचो; पण रंग्या मात्र आपल्या वर्गाशी एकनिष्ठ राहायचा! रांगडा गडी... धिप्पाड शरीरयष्टी... चेहऱ्यावर कायम बेफिकीर भाव. शिक्षक वर्गातून बाहेर पडले की शाळेच्या आवारात रंग्याचीच हुकूमत असायची. त्याच्या परवानगीशिवाय तिथे पानही हलत नसे—अशी त्याची दहशत! शाळेत शिक्षकांकडून आम्ही अभ्यासक्रमातील विषय शिकायचो; पण अभ्यासक्रमाबाहेरचे काही विषय रंग्याने आम्हाला शिकवले. बिडी कशी प्यायची... नाकातून धूर कसा सोडायचा... आगपेटी नसताना दोन काड्यांच्या मदतीने बिडी कशी पेटवायची... लोखंडी खांबावर किंवा फरशीवर काडी घासून अग्नी कसा प्रज्...